शालेय मंत्री दीपक केसरकर यांच्या घरी लाडक्या बाप्पाचं आगमन झालेलं आहे. सावंतवाडीतील त्यांच्या घरी त्यांनी सहकुटुंब गणरायाची पुजा केली आणि आज सकाळी दीपक केसरकर यांच्या घरी गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
यादरम्यान दीपक केसरकर म्हाणाले की, गणेश चतुर्थीचा सण हा अत्यंत पवित्र आणि उत्साहामध्ये साजरा केला जातो. सणाचं पावित्र्य जपत असतानाच जो उत्साह असतो तो फार मोठा असतो. तसेच लाखो भाविक या सणामध्ये सहभागी होतात. यानिमित्ताने कोकण आणि संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व गणेशप्रेमींना मी हार्दिक शुभेच्छा देतो.